आकार:
कावळा + (51 सेमी)पटकन ओळखण्याची खूण:
- काळा रंग. पाण्यात पोहोताना काळ्या बदकासारखा दिसतो.
- पाण्याकाठी बऱ्याचदा दोन्ही हात लांब केल्यासारखे पंख पसरून बसतो. टायटॅनिक सिनेमाच्या ‘टायटॅनिक पोझ’ सारखं!
- आकाराने सर्वात छोटा आणि सपाट डोक्याचा पाणकावळा
नर व मादी:
सारखेच दिसतात.सवयी:
- एकेकटा किंवा लहान समूहात आढळतो.
- उत्तम पाणबुड्या आहे. संपूर्ण शरीर पाण्याखाली बुडवून पाण्यातले मासे शोधतो.
- पिसांवर इतर पाणपपक्ष्यांसारख्या तेलग्रंथी नसल्याने पाणी पिसांमध्ये जमा होते. अशा स्थितीत तो उडू शकत नाहीत.भिजलेले पंख सुकण्यासाठी काठावर काही काळ पंख पसरून बसतो.
- पक्ष्यांचा थवा V आकारात उडतो.